मोदींच्या त्या वक्तव्याची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली


नवी दिल्ली – सध्या सोशल मिडीयात एका वक्तव्यावरुन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांना सळो की पळो करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच ट्रोल होऊ लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना एअर स्ट्राईकच्या दिवशी असणाऱ्या हवामानावर भाष्य केले. नेटकऱ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या वक्तव्याची सोशल मिडीयात खिल्ली उडवली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते की, बालाकोट एअरस्ट्राईकच्या वेळी अचानक हवामान खराब झाल्यामुळे भारतीय वैमानिक अशा स्थितीत पाकिस्तान सीमेत दाखल होतील का यावर संशय होता. त्यातच सर्जिकल स्ट्राईकची तारिख बदलण्यास वैज्ञानिकांनी सांगितले. पण दोन विषय माझ्या डोक्यात होते, एक म्हणजे गुप्तता आणि दुसरी म्हणजे आपण काही फार मोठे वैज्ञानिक नाही. पण मी त्यानंतर म्हणालो की, एवढ्या मोठ्या प्रमाणात आभाळ आणि पाऊस असेल तर त्याचा आपल्याला लाभही होऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानच्या रडारमध्ये आपण दिसणार नाही. आपल्याला या आभाळाचा लाभ होईल, असे आपण सांगितल्यामुळे सगळेच द्विधा मनस्थितीत होते. अखेरीस मीच म्हणालो, आभाळ आलेले आहे, चला पुढे जाऊ या…’, असे मोदींनी सांगितले. पण सोशल मिडीयात पंतप्रधान मोदींनी केलेल्या या विधानामुळे धुमाकूळ माजला आहे. मोदी यांनी केलेल्या विधानावर सोशल मिडीयात विनोदाचा पाऊस भरला आहे.

Leave a Comment