‘या’ गावातील वस्तुंना चुकूनही लावू नका हात


आपला देश वैविध्यपूर्ण परंपरेने नटलेला आहे, त्याचबरोबर विविध रहस्य आपल्या देशात दडलेली आहेत. त्यातील अनेक किस्से तुम्ही ऐकले किंवा पाहिले देखील असतील. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या कधी तुमच्या कानावर देखील पडल्या नसतील. आज आम्ही तुम्हाला आपल्या देशातील एका अशा गावाबद्दल सांगणार आहोत, ज्याचे रहस्य सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्यांचा धक्का नक्की बसेल.

मलाना हे गाव हिमाचल प्रदेशात असून या गावाचे नाव देशातील रहस्यमय अशा ठिकाणांमध्ये घेतले जाते. बाहेरच्या लोकांपासून या गावात राहणारे लोके अतिशय सावध राहतात. त्याचबरोबर या गावात बाहेरच्या लोकांसाठी विशेष नियम आणि कायदे बनविण्यात आले आहेत.

बाहेरच्यांना हे कायदे तंतोतत पाळावे लागतात. बाहेरून कोणी माणूस या गावात गेला आणि त्याने गावात असणाऱ्या कोणत्याही वस्तूला हात लावला तर त्याला दंड भरावा लागतो. जवळपास एक हजार रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत हा दंड असतो.

त्याचबरोबर गावातील कोणत्याही माणसाला स्पर्श करायचे नाही, असा नियम घालून देण्यात आला आहे. रहस्यमयरीत्या भितींवर हाडे आणि खोपडी लटकलेली गावात पाहायला मिळतात. कोणत्याही माणसाचे हे सांगाडे नसून जनावरांचे आहेत. बळी दिलेल्या जनावरांचे सांगाडे लटकलेले असल्याने बाहेरून आलेल्या माणसांसाठी ते आकर्षित करतात. त्यामुळे बाहेरच्या लोकांसाठी हे कायदे बनविण्यात आले आहेत.

Leave a Comment