पिवळ्यानंतर आता व्हायरल होत आहे निळी ड्रेसवाली महिला निवडणूक अधिकारी


भोपाळ – पिवळ्या साडीवाल्या महिला निवडणूक अधिकाऱ्याचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहेत. त्यानंतर निळ्या ड्रेसवाल्या महिला अधिकाऱ्याचेही फोटो आता व्हायरल होताना दिसत असल्यामुळे ही महिला अधिकारी कोण असा प्रश्न आता अनेक जण विचारत आहेत.

पिवळी साडीवाली कोण होती हे समजल्यानंतर निळ्या ड्रेसवाल्या महिलेला आता लोक नेटवर शोधू लागले आहेत. निळ्या ड्रेसवाल्या महिला अधिकाऱ्याचे फोटो फेसबुकपासून व्हॉट्सअपपर्यंत सर्वच सोशल मीडिया साईटवर फिरत आहेत. काहींनी तर या दोघींचे फोटो एकत्र करून ते व्हायरल केले आहेत.

दरम्यान, आता ही निळी ड्रेसवाली महिला कोण हे समोर आले आहे. भोपाळमधील गोविंदपुरा येथील आयटीआयमध्ये तयार केलेल्या मतदान केंद्रावरील कार्यरत त्या अधिकारी आहे. योगेश्वरी असे त्यांचे नाव आहे.

पिवळी साडीवाली महिला या लखनौच्या राहणाऱ्या आहेत. ५ मे रोजी एका वृत्तपत्राच्या छायाचित्रकाराने त्यांचे फोटो काढले होते. त्यांचे नाव रीना द्विवेदी असे आहे. त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, ते फोटो एवढे व्हायरल कसे झाले हे मलाही समजले नाही. त्यांचे फोटो पाचव्या टप्प्यातील मतदानावेळी घेण्यात आले होते.

Leave a Comment