हृदयविकाराचा झटका आल्यास घाबरून न जाता ‘हे’ उपाय केले तर वाचू शकतो जीव


हृदयविकाराचा झटका जर कुणाला आला तर अजिबात घाबरून न जाता हे पाच उपाय जर केले तर तुम्ही रुग्णाचा जीव वाचू शकता. महत्वाची गोष्टी म्हणजे रुग्णवाहिका ताबडतोब बोलवा. बहुतांश रुग्णवाहिकांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध राहत असल्यामुळे रुग्णावर ताबडतोब उपचार सुरू केले जाऊ शकतात.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला मळमळते. त्या रुग्णाला अशावेळेस एका कडेवर वळवा. त्याला असे केल्याने मोकळा श्वास घेता आल्याने त्याची तिव्रता कमी होते. तसेच फुप्फुसांना नुकसान होत नाही. मानेजवळ रुग्णाच्या हात ठेवून त्याचा पल्स रेट चेक करा. तो जर 60 ते 70 पेक्षा जास्त असेल तर रक्तदाब झपाट्याने वाढतो आणि रुग्णाची प्रकृती नाजूक आहे असे समजून तात्काळ रुग्णालयात हलवा.

कमी जास्त पल्स रेट होत असेल तर रुग्णाला झोपवून त्याचे पाय वर उचला. यामुळे पायाकडील रक्तप्रवाह त्याच्या हृदयाकडे वळतो. असे केल्याने त्याला बऱ्यापैकी आराम मिळतो. रुग्णाला झोपवल्यानंतर त्याचे कपडे जरा सैल करा. अशा परिस्थितीत त्याला जास्त हालचाल करायला लावू नये. रुग्णाने गाडी चालवता कामा नये, तसेच जिने चढणे-उतरणे टाळावे. असे काही घडत असेल तर रुग्णाभोवती जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. पुरेशी हवा त्याला मिळेल नीट श्वास घेता येईल येची काळजी घ्या. अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट यापैकी कोणतिही एक गोळी रुग्णाला द्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment