ट्रम्प यांना व्यवसायात ८१ अब्ज ३६ कोटींचे नुकसान


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जगातील ओळख यशस्वी बिझिनेसमन अशी आणि यशस्वी डील करणारे राष्ट्रपती अशी असली तरी त्यांच्या खासगी व्यवसायाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याचे कारण म्हणजे न्यूयॉर्क टाईम्सने गेल्या १० वर्षात ट्रम्प यांना व्यवसायात सोसाव्या लागलेल्या नुकसानीची आकडेवारी हे आहे. ब्लुमबर्गने या संदर्भात त्याच्या अहवालात प्रश्न उपस्थित केले आहेत.

न्यूयॉर्क टाईम्सने गेल्या १० वर्षात ट्रम्प यांनी अयशस्वी व्यापारी सौदे केले असून त्यामुळे त्यांना १.१७ अब्ज डॉलर्स नुकसान सोसावे लागले आणि यामुळे त्यांनी ८ वर्षे आयकर विवरण पत्र भरलेले नाही असे म्हटले आहे. ही आकडेवारी १९९१ पासूनची आहे. त्यानुसार या वर्षापासून ट्रम्प यांना वर्षाला २५० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले होते मात्र तरीही त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविताना आपण यशस्वी बिझिनेसमन आणि यशस्वी डील करणारे असल्याचा खोटा प्रचार केला होता. अमेरिकेत आगामी निवडणुकीपूर्वी डेमोक्रॅटिक आणि कॉंग्रेस ट्रम्प यांच्या नव्या आयकर विवरण पत्रातील माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाईम्सने ही बातमी दिली आहे.


अर्थात या वर्तमानपत्राने त्याच्या हाती प्रत्यक्ष कर विवरण पत्रे लागलेली नाहीत असा खुलासा करून ही माहिती आयआरएस कर टेप मधून मिळविल्याचे सांगितले आहे. या कर माहिती टेप १९८५ ते १९९४ या काळातील आहेत. १९८५ मध्ये ट्रम्प यांना कॅसिनो आणि हॉटेल व्यवसायात ४६.१ दशलक्ष डॉलर्स नुकसान होते आणि तेव्हापासून त्यांचा व्यवसाय नुकसानीत आहे त्यामुळे या १० वर्षातील ८ वर्षे त्यांनी आयकर भरलेला नाही असे नमूद केले गेले आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या करिअरची सुरवात वडिलांच्या एलिजाबेथ ट्रम्प अँड सोन रिअल इस्टेट कंपनीतून केली होती आणि नंतर याच कंपनीचे नाव ट्रम्प ऑर्गनायझेशन असे केले गेले. मॅनहटन, न्यूयॉर्क येथे कंपनीने अनेक यशस्वी रिअल इस्टेट सौदे केले आणि जगभरात लॉजिंग आणि गोल्फ क्लब उभारण्याचे काम केले. या कंपनीने १९९६ ते २०१५ या काळात अनेक सौंदर्यस्पर्धाचे पूर्णपणे किंवा अंशिक मालकी मिळविली असून त्यांनी न्यूजर्सी फुटबॉल टीम खरेदी केली होती.

Leave a Comment