‘येथे’ करु शकता तुम्ही आधार आणि पॅन लिंक


सरकारने आता आधार आणि पॅन लिंक करण्याबाबत मोठा निर्णय घेतला असून सरकारने 30 सप्टेंबर 2019पर्यंत आधार कार्ड – पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवली आहे. पण ती तुम्ही लिंक केले नसेल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. तर चला मग जाणून घेऊयात काय आहे पद्धत

आयकर खात्याच्या www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही जा. तुम्हाला तिथे क्विक लिंक नावाचे टॅब मिळेल. त्यात लिंक आधार नावाचा पर्याय मिळेल. त्यानंतर नवे पेज ओपन होईल. या पेजवर क्लिक हियर असे दिसेल. तिथे क्लिक करून जर तुम्ही अगोदर अर्ज दिला असेल तर स्टेटस समोर येईल. तुम्हाला त्यावर आधार कार्ड आणि पॅन कार्डाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर ‘व्ह्यू लिंक आधार स्टेटस’वर क्लिक करा. मग तुम्हाला कळेल तुमचे पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक आहे की नाही.

SMS करून देखील तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. तुम्हाला यासाठी 567678 किंवा 56161 या नंबरवर 12 आकड्यांचा आधार क्रमांक आणि 10 आकडी पॅन क्रमांक SMS तुम्हाला करायला हवा.

समजा तुमचा आधार क्रमांक 123456789123 आहे आणि पॅन क्रमांक ABCDE1234F आहे. तुम्हाला UIDAPAN 123456789123 ABCDE1234F लिहून SMS करा. त्यावरून तुम्हाला स्टेटस कळेल. आयटी रिटर्न फाईल करताना आधार कार्ड – पॅन कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. नाही तर रिटर्न भरताच येणार नाही.

Leave a Comment