बिलकिस बानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला दणका

supreme-court
नवी दिल्ली – आज गुजरात दंगल बिलकिस बानो खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वूर्ण निर्णय दिला आहे. २००२ ला गुजरातमध्ये बिकलीस बानो यांच्यावर सामूहिक अत्याचार झाला होता. गुजरात सरकारने त्यांना ५० लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत.

अहमदाबादच्या रंधिकपूर येथे १७ लोकांनी गोध्रा दंगलीदरम्यान बिलकिस बानोंच्या कुटुंबावर हल्ला केला होता. ७ लोकांची त्या वेळी हत्या करण्यात आली. तसेच, बिलकिस बानो यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. बिलकिस बानो या त्यावेळी ६ महिन्यांच्या गरोदर होत्या. हल्लेखोरांनी इथपर्यंतच न थांबता बिलकिस यांच्या २ वर्षीय मुलीलाही मारहाण करत ठार केले होते. या हल्ल्यात बिलकिस बानो यांच्या कुटुंबातील एकूण १४ लोकांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment