व्हॉट्सअॅप ग्रुपने आणले ग्रुप्स प्रायव्हेसी फिचर

whatsapp
मुंबई : व्हॉट्सअॅपमध्ये सातत्याने युजर अधिकाधिक फ्रेन्डली होण्यासाठी नवे फीचर्स आणले जात आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये नवनवीन बदल केले जात आहेत. आपल्याला कोणीही उठ-सूट व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये अॅड करतो. त्यामुळे अनेकजण या गोष्टीला वैतागलेले आहेत. पण यापुढे तुमच्या परवानगीशिवाय आता कोणीही तुम्हाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. त्यासाठी व्हॉट्सअॅपने नवे फीचर आणले आहे.

आपल्या परवानगीशिवाय कोणीही आपल्याला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करतो, अनेकांना त्याचा खूप त्रास होतो. विशेषतः यामुळे महिलांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो. त्यांच्या परवानगीशिवाय महिलांना एखाद्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करून त्या ग्रुप्समध्ये अश्‍लील मेसेजेस, फोटोज किंवा व्हिडीओज शेअर करण्याचे प्रकार घडले आहेत. पोलीस स्थानकांमध्ये याबाबत अनेकदा तक्रारीदेखील दाखल झालेल्या आहेत. व्हॉट्सअॅपने या सर्व प्रकारांमधून बोध घेत ग्रुप्स प्रायव्हसीचे नवीन फीचर आणले आहे. काही लोकांच्या मोबाईलवर हे फीचर सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध होईल.

या फिचरचा वापर करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जाऊन व्हॉट्सअॅप अपडेट करा. त्यानंतर व्हॉट्सअॅप सेटिंग्समध्ये जाऊन अकाऊंट्सवर क्लिक करा. अकाऊंट्समध्ये प्रायव्हसीमध्ये जा, तिथे ग्रुप्स असा ऑप्शन असेल, त्यावर क्लिक करा. ग्रुप्सवर क्लिक केल्यावर तीन ऑप्शन्स दिसतील, a)एव्हरीवन, b)माय कॉन्टॅक्टस आणि c)नोबडी

a)एव्हरीवन : केवळ तुमच्या ओळखीच्या लोकांनीच जर तुम्हाला कोणत्याही ग्रुप्समध्ये अॅड करावे, असे वाटत असेल तर माय कॉन्टॅक्ट्स हा ऑप्शन सिलेक्ट करा
b)माय कॉन्टॅक्टस : कोणीही ग्रुप्समध्ये तुम्हाला अॅड करु नये, असे वाटत असेल तर नोबडी हा ऑप्शन सिलेक्ट करा
c)नोबडी : तुम्हाला कोणीही कोणत्याही ग्रुप्समध्ये अॅड करावे, असे वाटत असेल तर एव्हरीवन हा ऑप्शन सिलेक्ट करा

Leave a Comment