हे तारे तारका करू शकत नाहीत मतदान

deepika
लोकसभा निवडणुकीचे मतदान देशात विविध ठिकाणी टप्प्याटप्याने सुरु आहे आणि समाजातील अनेक प्रतिष्ठित तसेच बॉलीवूड मधील सेलेब्रिटी तारे तारका मतदान करा असे आवाहन नागरिकांना करत आहेत. बॉलीवूड तारे तारकांच्या आवाहनामुळे सर्वसामान्य नागरिकांना मतदान करण्यास प्रोत्साहन मिळते असे मानले जाते. मात्र यातील अनेक दिग्गज तारे आणि तारका भारतात लोकसभेसाठी मतदान करू शकणार नाहीत कारण त्यांना मतदानाचा हक्कच नाही. याउलट अनेक तारे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

गेली अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये टॉप अभिनेत्री राहिलेली दीपिका पादुकोने बंगलोर मध्ये वाढली आणि शिकली. पण तिचा जन्म डेन्मार्कमधला असून तिचे नागरिकत्व त्याच देशाचे आहे. ती भारतीय नागरिक नसल्याने मतदान करू शकत नाही. तसेच देशप्रेमावरील अनेक चित्रपटातून झळकलेला खिलाडी अक्षयकुमार अमृतसर मध्ये जन्माला आला असला तरी त्याने कॅनडाचे नागरिकत्व घेतले आहे त्यामुळे तोही भारतात मतदान करू शकत नाही.

katarina
राजी चित्रपटात भारतासाठी हेरगिरी करणाऱ्या मुलीची भूमिका करणारी आलीया भट्ट सुद्धा भारतीय नागरिक नाही. तिची आई सोनी ब्रिटीश नागरिक आहे आणि आलीयाही ब्रिटीश नागरिक असून तिचा पासपोर्ट ब्रिटनचा आहे. त्यामुळे तीही भारतात मतदान करणार नाही. बॉलीवूड मध्ये सेन्सेशन ठरलेली कतरिना कैफकडे युकेचा पासपोर्ट आहे. तिचा जन्म हॉंगकाँगमधला आहे. आजकाल खूपच चर्चेत असलेली सनी लीयोनीचे खरे नाव करनजीत कौर असले आणि तिचे आईवडील भारतीय असले तर सनी कॅनडाची नागरिक आहे.

jacqueline
बॉलीवूड दिवा जॅकलीन फर्नाडीसचा जन्म बहारीनचा असून ती श्रीलंकन नागरिक आहे. कारण तिचे वडील श्रीलंकन तर आई मलेशियन आहे. आमीरखानचा भाचा इम्रान जाने तू या जाने ना या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये आला असला आणि त्याची बायको हिंदू असली तरी त्याच्याकडे अमेरिकन पासपोर्ट आहे त्यामुळे तो भारताचा नागरिक नाही आणि मतदान करू शकत नाही.

Leave a Comment