बीएमडब्ल्यूची सर्वात स्वस्त ६२०डी ग्रान टुरीस्मो भारतात लाँच

turismo
जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यूने बुधवारी भारतात त्यांच्या ६ सिरीज मधील ग्रान टुरीस्मो सेदानचे नवे डीझेल व्हेरीयंट लाँच केले असून या कारची एक्स शोरूम किंमत ६३.९० लाख आहे. या सिरीज मधील ही सर्वात स्वस्त कार असून ती कंपनीच्या चेन्नई प्लांट मध्ये असेम्बल केली गेली आहे. कंपनीच्या डीलर्सकडे या कारसाठी बुकिंग करता येणार आहे.

कंपनीच्या ६ सिरीज जीटी लाईनअप मधील हे सर्वात खास व्हेरीयंट असल्याचे ग्रुप इंडिया प्रेसिडेंट हंस ख्रिस्चिअन बर्टेल यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही ६ सिरीज ग्रांन टुरीस्मो भारतीय बाजारात लाँच करून एन्ट्री लेव्हल डीझेल इंजिन कारचे नवे सेगामेंट कार बाजारात आणले आहे. या कारला २.० लिटरचे चार सिलिंडर, ट्वीन टर्बो डीझेल इंजिन दिले गेले असून आठ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. ही कार ७.९ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग घेऊन शकते. या कारला स्पोर्ट, कम्फर्ट, कम्फर्ट प्लस, इको प्रो, अॅडप्टीव्ह ड्रायविंग मोडस आहेत. मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी इलेक्टोनिक पद्धतीने अॅडजस्ट होणाऱ्या सीट, १०.२ इंची एन्टरटेनमेंट स्क्रीन, ब्ल्यूरे प्लेयर, एचडीएमआय कनेक्शन, एमपी ३ प्लेअर कनेक्शन व गेमिंग कॅन्सोल अशी फीचर्स आहेत.

Leave a Comment