आज एप्रिल फुल डे

foolday
एप्रिल महिन्याचा पहिला दिवस म्हणजे १ एप्रिल जगात अनेक देशात एप्रिल फूल डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नातेवाईक, मित्रमंडळी, दोस्त, शेजारी, परिचित यांना मूर्ख बनविण्याचा मजेदार प्रयत्न केला जातो आणि एखादा फसला तरी त्याबद्दल राग किंवा नाराजी व्यक्त केली जात नाही. मौजमस्ती, चेष्टा अश्या वातावरणात हा दिवस मनविला जातो तर काही देशात या दिवशी सुट्टी जाहीर केली जाते.

विशेष म्हणजे वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या वेळी हा दिवस साजरा होतो. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, द.आफ्रिका या देशातून सकाळपासून दुपार होईपर्यंतच हा दिवस साजरा होतो तर फ्रांस, द. कोरिया, आयर्लंड, इटली, जपान, रशिया, नेदरलंड, कॅनडा, जर्मनी, अमेरिका, ब्राझील या देशात पूर्ण दिवसभर एप्रिल फुलची मस्ती असते. अमेरिकेत या दिवशी रेडीओ वरून चुकीची माहिती देणे, घाबराविणाऱ्या वस्तूंचा वापर करून लोकांना बेवकूफ बनविले जाते.

april
स्कॉटलंडमध्ये हा खेळ दोन दिवस चालतो. गाऊट हंट डे या नावाने पहिला दिवस साजरा होतो. गाऊट याचा अर्थच बेवकूफ, दुसरा दिवस टायलाय डे म्हणून साजरा होतो. त्यामध्ये एकमेकांना मागे शेपूट लावली जाते. फ्रांस आणि इटली मध्ये एकमेकाच्या पाठीवर नकळत कागदी मासे चिकटविले जातात. भारतात हा बाहेरून आलेला दिवस आहे. पण येथेही एकमेकांना फसविणे, घाबरविणे, चुकीची माहिती देणे असे प्रकार होतात मात्र त्यानंतर एप्रिल फुल असे म्हटले जाते. ग्रीस देशात या दिवसाचा संबंध गुड लक शी जोडला गेला आहे. म्हणजे जो कुणी या दिवशी फसेल त्याला नवे वर्ष भरभराटीचे जाणार असे मानतात.

या दिवसाची सुरवात नक्की कधी आणि कुठे झाली याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. मात्र काही जणांच्या मते फ्रांस मध्ये नवे १ जानेवारी पासून सुरु होणारे ग्रेगरीअन कॅलेंडर सुरु झाले तेव्हा त्याची सुरवात झाली असावी. फ्रांस मध्ये त्यापूर्वी ज्युलिअन कॅलेंडर वापरले जात असे आणि त्याची सुरवात १ एप्रिल पासून होत असे. दुसरे असे सांगतात की इंग्लंडचा राजा रिचर्ड दुसरा आणि अॅन यांच्या साखरपुड्याची तारीख ३२ मार्च अशी छापली गेली होती. ३२ मार्च म्हणजे १ एप्रिल असे मानले गेले आणि तेव्हापासून एप्रिल फुल डे साजरा केला जाऊ लागला.

Leave a Comment