83 द्वारे कपिल देव यांच्या मुलीचे बॉलीवूड पदार्पण

amiya-dev
कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 1983 साली देशासाठी पहिला विश्वचषक जिंकला होता. आता त्याच 1983च्या आठवणी आपल्या मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहेत. हा चित्रपट तुमच्या भेटील दिग्दर्शक कबीर खान घेऊन येत आहेत. या चित्रपटात कपिल देव यांची व्यक्तिरेखा बॉलीवूडचा बाजीराव अर्थात रणवीर सिंह हा साकारणार आहे. तसेच कपिल देव यांचा क्रिकेटमधील खडतर प्रवास आणि त्यानंतर जिंकलेल्या विश्वचषकांच्या घटना अधोरेखित करण्यात येणार आहे.

कपिल देव स्वतः जातीने या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सहकार्य करणार आहेत. त्याचबरोबर चित्रपटासाठी लागणारे प्रशिक्षण देखील कपिल देत आहेत. पण या चित्रपटाद्वारे कपिल देव यांची मुलगी अमिया देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटासाठी ती दिग्दर्शिकेचे काम करणार असल्याची माहिती संदीप पाटील यांचा मुलगा चिराग याने दिली आहे.

याबाबत माहिती देताना चिराग सांगतो की, पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना भेटलो. अमिया दिल्लीची असून मी मुंबईकर आहे आणि माझ्यापेक्षा वयाने ती लहान आहे. नेहमीच्या ट्रेनिंग दरम्यान ती सहभागी होते. मी जेव्हा जेव्हा कबीरच्या ऑफिसला भेट दिली तेव्हा तेव्हा मला अमिया तेथे दिसली आहे. चित्रपटाची संपूर्ण टिम काही दिवस धरमशाला येथे राहणार आहे. येथील टिमचे ट्रेनिंग सेशन संपल्यानंतर चित्रपटाच्या शुटिंगसाठी संपूर्ण टिम लंडन आणि स्कॉटलंडला रवाना होणार आहे.

Leave a Comment