पोलीस हवालदार सुनीलकुमार जगातील सर्वात उंच रेसलर

sunilkumar
रेसलिंग त्यातही डब्ल्यूडब्ल्यूइचे शौकीन अंडरटेकर, ट्रिपल एच, जॉन सीना यांच्याशी चांगलेच परिचित आहेत तसेच भारतीय रेसलर द ग्रेट खली उर्फ दिलीपसिंह राणा याचेही चाहते असतील. या दुनियेत आणखी एका नव्या नावाची भर पडली असून सुनील कुमार हा जम्मू काश्मीर पोलीस दलात हवालदार असलेला युवक जगातील सर्वाधिक उंच रेसलर ठरला आहे. त्याचे रिंग नेम द ग्रेट अंगार असे आहे.

भारतात रेसलरची मोठी परंपरा आहे. दारासिंग हे पहिले लोकप्रिय रेसलर होते आणि डब्ल्यूडब्ल्यूइ मध्ये चांगली कामगिरी करून खलीने लोकप्रियता मिळविली आहे. सुनीलकुमार उर्फ द ग्रेट अंगार यालाही डब्ल्यूडब्ल्यूइ मध्ये सहभागी होऊन देशाचे नाव उज्ज्वल करण्याची इच्छा आहे. सुनील कुमारची उंची ७ फुट ६ इंच असून तो खली पेक्षाही ५ इंचाने उंच आहे. त्याचे वजन १५० किलो आहे त्यामुळे लोकांच्या नजरा त्याच्याकडे साहजिकच वळतात. त्याचे वडील लष्करातून निवृत्त झाले आहेत.

सुनीलकुमारचे जीवन बदलण्यास फेसबुक कारणीभूत ठरले आहे. त्याची कथा अशी, सुनीलकुमारने त्याचे अनेक फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. ते पाहून रेसलर स्क्वायरचे संस्थापक विनायक सोधी यांची नजर सुनीलकुमार याच्यावर पडली आणि त्यांनी त्याला स्वतःच्या अकादमीत रेसलिंगचे प्रशिक्षण दिले. त्यात सुनीलकुमारने चांगलेच प्राविण्य मिळविले असून डेब्यू करतानाच त्याने अनेकांना अस्मान दाखविले आहे. सुनील आणि खली यांचीही भेट झाली आणि खलीने त्याला आहार. व्यायाम या संदर्भात मार्गदर्शन केले आहे.

Leave a Comment