टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रोबो महत्वाची भूमिका बजावणार

robot
जपानच्या टोक्यो २०२० च्या ऑलिम्पिक स्पर्धा ऐतिहासिक ठरणार आहेत कारण यात जगात प्रथमच मैदानात आणि मैदानाबाहेर रोबोंचा प्रचंड प्रमाणात वापर केला जाणार आहे. खेळाडूना बॉल देणे, ड्रिंक देणे याबरोबरच जगभरातून आलेल्या प्रेक्षकांना स्टेशन, विमानतळावर उतरल्यावर प्रवासी आणि त्यांचे सामान हॉटेल मध्ये पोहोचविणे, रेल्वे, बसची माहिती देणे अशी मदत हे रोबो करणार आहेत.

शुक्रवारी अशी सेवा देणारे रोबो जपानने जगासमोर सादर केले आहेत. जपान मध्ये यापूर्वी १९६४ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. त्यानंतर २०२० साली दुसऱ्यावेळी जपान यजमान आहे. शुक्रवारी जपानने दोन रोबो सादर केले असून त्यातील एक माणसाना मदत करणारा आहे तर दुसरा डिलिव्हरी सपोर्ट करणारा आहे. दुसरा रोबो १ मिटर उंच आहे आणि तो कोणतीही वस्तू पकडू शकतो. रिमोट कंट्रोलने हे रोबो नियंत्रित होणार आहेत. पॅरा ऑलिम्पिक खेळाडूना हे रोबो खूपच उपयुक्त ठरणार आहेत. असे २६ रोबो ट्रॅक आणि फिल्ड स्टेडियम मध्ये असतील असे समजते.

Leave a Comment