बटाट्याच्या पाच चिप्सची किंमत ४४०० रुपये

strikes
बटाटा वेफर्स किंवा चिप्स हे फावल्या वेळचे खाणे म्हणून लोकप्रिय आहे. दिवसाच्या अथवा रात्रीच्या कोणत्याची वेळी चिप्स खायला कुणी नकार देत नाही हा अनेकांचा अनुभव असेल. थोडक्या किमतीत आणि जिभेला मस्त चव देणारे चिप्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाचे आवडते खाद्य आहे. स्वीडन मधील एका कंपनीकडून विकले जाणारे बटाटा चिप्स विकत घ्यायचे असतील तर दोन वेळा विचार करायला हवा. कारण हे बहुदा जगातील सर्वात महाग चिप्स असावेत. एका डब्यात ५ चिप्स भरलेला हा पॅक विकत घेण्यासाठी ६२ डॉलर्स म्हणजे चक्क ४४०० रुपये मोजावे लागतात.

chips
हे चिप्स बनविताना अत्यंत दुर्मिळ आणि महाग अश्या पाच पदार्थांचा वापर केला जातो आणि त्यामुळे हे चिप्स महाग आहेत असे समजते. यासाठी जे बटाटे वापरले जातात ते स्वीडनच्या दुर्गम भागात पिकतात आणि वर्षातून एकदाच या बटाट्याची तोड होते. त्याला ब्लु हर्वेस्त मून असे नाव आहे. हा भाग डोंगराळ आणि अति दुर्गम आहे. चिप्स तयार करताना माटसुटेक नावाचे एक प्रकारचे मश्रूम वापरले जाते. ते स्वीडनच्या जंगलात मिळते आणि विशेष प्रकारचे कपडे घालूनच ते तोडावे लागते. तिसरा पदार्थ क्राऊन हिल नावाचे झुडूप असून ते ऑस्ट्रेलियातील बेटांवर मिळते. शेवटचा पदार्थ सीवीड. ते समुद्रातून आणावे लागेते.

विशेष म्हणजे या चिप्स आवडीने खाणारे अनेक ग्राहक असून ते किमतीची पर्वा न करता हे महागडे चिप्स खरेदी करतात आणि फस्त करतात.

Leave a Comment