फेरारीची नवी एफ ६ ट्रीब्यूटो जिनेव्हा शो मध्ये सादर

feraa
फेरारीने त्यांची नवी सुपरकार एफ ६ ट्रीब्यूटो जिनेव्हा मोटर शो मध्ये लाँच केली असून तिचे अधिकृत लाँचिंग ५ मार्च म्हणजे आज होत आहे. ही कार फेरारी ४८८ जीटीबीला रिप्लेस करणार आहे. या कारचे वजन फेरारी ४८८ जीटीबीच्या तुलनेत ४० किलोनी कमी आहे असा कंपनीचा दावा आहे.

या कारचे डिझाईन बरेचसे फेरारी ४८८ पिस्ता प्रमाणे असले तरी त्यात काही महत्वपूर्ण बदल केले गेले आहेत. डीप क्रीझ, शार्प हेडलाईट, रिअरमध्ये नवे डिझाईनचे एक्स डक्ट इन्टेक्स, ७ इंची टचस्क्रीन डिस्प्ले, नवे स्टिअरिंग व्हील दिले गेले आहे. या कारला ३९०२ सीसीचे टर्बोचार्ज्ड व्ही ८ इंजिन असून हे इंजिन सर्वाधिक पॉवरफुल असल्याचे मानले जाते. ही कार २.९ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३४० किमी.

Leave a Comment