
भाजप खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी भारतीय हवाई दलाच्या एरियल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी कलाकार अली जफरची चांगलीच कान उघडणी केली आहे. परेश रावल यांनी पाकिस्तानी कलाकार अली जफरला आता बोलती बंद झाली का, असे म्हणत त्याच्यावर निशाणा साधला आहे. मंगळवारी पहाटे पावणेचार वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथील जाभामधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले करीत ते तळ उद्ध्वस्त केले. पुलवामा येथे सीआरपीएफ दलाचे ४१ जवान ‘जैश-ए-मोहम्मद’च्या भ्याड हल्ल्यात शहीद झाल्याच्या १२व्या दिवशी झालेल्या या दमदार कारवाईचे देशवासियांनी जल्लोषात स्वागत केले आहे.
एरियल स्ट्राईकनंतर मौन बाळगणाऱ्या पाक कलाकाराला परेश रावलचा टोला
Now speechless!!! https://t.co/cY8RrkfAgh
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 26, 2019
पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने पुलवामा हल्ल्यानंतर ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाची स्तुती केली होती. आता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर परेश रावल यांनी अलीच्या त्याच ट्विटवरून आता का बोलती बंद झाली, असा टोला लगावला आहे.
