हवाई हल्ल्यासाठी या कारणांमुळे बालाकोटची केली गेली निवड

balakot
मंगळवारी भल्या पहाटे भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० विमानांनी पाकिस्तान नियंत्रण रेषेपासून ८० किमी आत आणि अबोटाबादच्या जवळ असलेल्या बालाकोट येथे भरारी मारून तेथील दहशदवादी तळांवर बॉम्बफेक करून ३५० दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. हल्ल्यासाठी बालाकोटचीच काही कारणांनी निवड केली. हि निवड गुप्तचर खात्याकडून मिळत असलेल्या अचूक माहितीच्या आधारावर केली गेली होती असे समजते. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार पुलवामा हल्ल्यानंतर आणखी हल्ले करण्याच्या योजना आखल्या गेल्याची माहिती गुप्तचरांनी दिली होती. पुलवामा येथे दहशद्वाद्यानी राखीव पोलीस दलावर केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केले जातील हे लक्षात घेऊन पाकिस्तानी सरकारने नियंत्रण रेषेजवळ असलेल्या दहशदवादी तळांवरून दहशतवाद्यांना सुरक्षा मिळावी म्हणून बालाकोट येथे हलविले होते.

balaghat
तेथे अगोदरपासून जैश ए मोहम्मदचे कॅम्प आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर दहशद्वाद्यांना प्रशिक्षित केले जाते. हिजबुल मुजाहिद्दीनचे प्रशिक्षण शिबिरे येथे आहेत. हा भाग पख्ख्तून प्रांतात कुन्हार नदी जवळ असून आजूबाजूने उंच पहाड आहेत. नैसर्गिक दृष्ट्या हा भाग अतिशय सुंदर आहे. येथील अतिरेकी शिबिरात किमान ३२५ अतिरेकी आणि २५ ते २७ प्रशिक्षक असल्याचे खबर भारताला होती. जैश ए मोहम्मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती आणि याच तालावर मसूद अझर भडकावणारी भाषणे देतो याचीही खबर होती.

strike
या शिबिरातून दहशद्वाद्याना तणावपूर्ण वातावरणात रणनीती आखणे, शास्त्रे, स्फोटके हाताळणे, सुरक्षा दलांवर हल्ले करणे, आत्मघाती बॉम्ब बनविणे, स्फोटके भरलेली वाहने तयार करून योग्य जागी लावणे असे प्रशिक्षण दिले जाते. पाकिस्तानने नियंत्रण रेषेच्या आत घुसून भारत हल्ले करेल याची अपेक्षा केली नव्हती आणि त्यामुळे ते थोडे गाफील होते. याचा विचार करूनच थेट बालाकोटची निवड केली गेली.

Leave a Comment