एके ४७ निर्मात्या क्लाशिक्नोव्हने आणली सुसाईड ड्रोन

drone
जगभरतील देशांच्या सेनांनी प्रथम पसंती दिलेल्या एके ४७ ची निर्मिती करणाऱ्या क्लाशिक्नोव्ह कंपनीने आता आकाशावर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अबुधाबी येथे भरलेल्या डिफेन्स एग्झिबिशन मध्ये कंपनीने त्याची पहिली झलक पेश केली आहे. कंपनीने अतिशय घातक अशी सुसाईड ड्रोन येथे सादर केली असून त्यामुळे युद्धाचे परिमाण बदलेल असा दावा केला आहे.

कंपनीच्या एके ४७ बंदुका जगभरात आजही अतिशय घातक आणि अचूक निशाना साधणाऱ्या म्हणून प्रसिद्ध आहेत. कंपनीने आता केयुबी- युएव्ही या नावाने ड्रोन तयार केले असून त्यातून एकावेळी ६ पौंडाची स्फोटके नेता येतात. अन्य ड्रोनच्या तुलनेत ते स्वस्त आहे आणि वापरायला सहज सोपे आहे. यामुळे लढाईचे तंत्र बदलेल असा दावा केला जात आहे.

हे ड्रोन ४ फुट रुंदीचे आहे आणि ताशी ८० मैल वेगाने ते हवेत ३० मिनिटे उडू शकते. ते कॉफी टेबलच्या आकाराचे आहे. यात टार्गेट माहिती फीड करता येते आणि क्रुझ मिसाईल प्रमाणे ते ४० मैल दूर असलेया शत्रूवर अचूक टार्गेट करता येते असे समजते.