सलमानच्या नोटबुकचा ट्रेलर रिलीज

notebook
नेहमीच अनेकांचा गॉडफादर राहिले बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या प्रॉडक्शन अंतर्गत तयार होत असलेल्या नोटबुक या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. प्रनूतन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. झहीर इक्बालसुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणार आहे. हा ट्रेलर स्वतः सलमान खानने सोशल मीडियावर रिलीज केला आहे.

प्रनूतन चित्रपटात शिक्षिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिने आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर इक्बाल तिच्या जागी इक्बाल नोकरीसाठी रूजू होतो. या दोघांमध्ये असलेले प्रेम संबंध चित्रपटात चाहत्यांना अनूभवता येणार आहे. त्याचप्रमाणे काश्मीरच्या प्रश्नांवरही चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. २९ मार्च रोजी चित्रपट चित्रपटागृहात दाखल होणार आहे.

Leave a Comment