भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंना नाकारला व्हिसा

vvisa
नवी दिल्ली – शुटिंग विश्वचषक स्पर्धा देशाची राजधानी नवी दिल्ली येथे होणार असून भारत सरकारने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानतंर पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान भारताकडून व्हिसा मिळाल्याची घोषणा पाकिस्तानच्या राष्ट्रीय नेमबाजी संघटनेचे सचिव रजी अहमद यांनी केली होती. पण अवघ्या काही तासातच आपल्या वक्तव्यावरुन यु टर्न घेत व्हिसा मिळाला नसल्याचे सांगितले. या विश्वचषकास आजपासून सुरुवात होत असून जीएम बशीर आणि खलील अहमद या २ खेळाडूंच्या व्हिसासाठी पाकिस्तानने अर्ज केला होता. या खेळाडूंना भारत सरकारने हल्ल्यापूर्वी व्हिसा दिला होता. त्यानंतर तो नाकारण्यात आला आहे.