‘फोर्ब्स’ला घ्यावी लागली ठाण्यातील मराठमोळ्या तरुणाची दखल

sagar-yarnalkar
मुंबई : जिद्द आणि इच्छाशक्तीमुळे तुम्हाला कोणतेही यश मिळविण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. याची आपण अनेक उदाहरणे पाहिली किंवा वाचली असेल. अशीच जिद्द आणि इच्छाशक्ती उराशी बाळगून एका मराठमोळ्या तरुणाने जगभरातील अब्जाधीशांची नावे झळकवणाऱ्या फोर्ब्सच्या यादीत नोंदवले गेले आहे. त्या मराठमोळ्या तरुणाचे नाव सागर यरनाळकर असे असून त्याने राबविलेल्या कल्पनेची दखल फोर्ब्सलाही घ्यावी लागली.
sagar-yarnalkar1
आजच्या घडीला आपल्याकडे अनेक अॅप्स उपलब्ध ज्याच्या माध्यमातून आपण हवे ते मागवू शकतो. हिच शक्कल सागरने लढवली आणिया मराठमोळ्या तरुणाने घरोघरी भाजीपाला, फळे आणि किराणा माल पोहचविण्याची व्यवस्था केली. त्यासाठी सागरने डेली निंजा हे अ‍ॅप बनविले आहे. यामध्ये त्याला अनुराग गुप्ता यानेही मदत केली.


मूळचा ठाण्याचा रहिवाशी असलेल्या सागरने इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली असून सागरचे नाव ३० अंडर ३० या फोर्ब्सच्या यादीत झळकले आहे. बेंगळुरुला त्याला नोकरीनिमित्त मित्रांसोबत राहत असताना ही कल्पना सुचली होती. त्याला त्याच्या आळशी मित्रांमुळे दूधवाल्यालाच ब्रेड, इडलीचे पीठ आदी वस्तू आणायला सांगावे लागायचे. यामुळे ही कल्पना प्रत्यक्षात राबविली तर, असा विचार करून मित्राच्या साथीने हा व्यवसाय सुरु केला.

Leave a Comment