
हिंदी सिनेसृष्टीच्या ज्येष्ठ नायिका दिवगंत नुतन यांची नात आणि अभिनेता मोहनिश बहल याची मुलगी प्रनुतन बहल लवकरच बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार असून तिचा बॉलीवूड प्रवेश भाईजान अर्थात सलमान खान घडवणार असल्याची बातमी आम्ही तुम्हाला काही दिवसांपूर्वी दिली होती.
प्रनुतन बहलच्या पहिल्यावहिल्या ‘नोटबुक’चे पोस्टर रिलीज
या चित्रपटाचे नाव नोटबुक असे असून नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडला दोन नवे चेहरे मिळणार आहेत. या चित्रपटात प्रनुतनसोबत जहीर इक्बाल देखील बॉलीवूडमध्ये प्रवेश करत आहे. जहीर हा सलमान खानच्या मित्राचा मुलगा आहे. सलमानने हे पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले असून त्याखाली त्याने बिना मिले कभी प्यार हो सकता है, असे कॅप्शन दिले आहे. १७ फेब्रुवारीला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येईल. नितीन कक्कर हे ‘नोटबुक’चे दिग्दर्शन करत आहेत. तर, मुराद खेतानी, सलमान खान आणि अश्विन वरदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २९ मार्च २०१९ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
