
पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी खोचक टोला मारताना आगामी लोकसभा निवडणूकीत बारामतीची जागा लढवू आणि जिंकूही. जे आधीच्या सरकारने २० वर्षात केले नाही, ते आम्ही या ५ वर्षात करून दाखवले, असे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित भाजप पक्ष मेळाव्यात ते बोलत होते. भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, कॅबिनेट मंत्री गिरीश बापट यावेळी उपस्थित होते.
यावेळीच्या लोकसभा निवडणूकीत बारामतीची जागा लढवू आणि जिंकूही – फडणवीस
बारामतीची जागा आगामी लोकसभा निवडणुकीत लढवू आणि जिंकूही. आपल्याला यावेळी पुणे, बारामती, शिरूर या तिन्ही जागा जिंकायच्या आहेत. पक्ष कार्यकर्त्यांना त्यासाठी कामाला लागावे लागणार आहे. जनतेपर्यंत आपल्या सरकारचे काम घेवून जावे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. तुम्ही येत्या काळात जर असे केले, तर २०१९ लोकसभा निवडणूक आपणच जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
