
पुणे – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधताना भाजपच्या लोकांनी खोटी आश्वासने देऊन पुणेकरांची फसवणूक केली आहे. त्यांनी पुणे शहराला बकाल केले असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या सरकारविरोधी पुणेकरांमध्ये एवढा संताप आहे की, पुणे शहरात भाजपच्या लोकांना हेल्मेट घालून फिरावे लागले, असेही चव्हाण म्हणाले.
खोटी आश्वासने देऊन भाजपच्या लोकांनी केली पुणेकरांची फसवणूक – अशोक चव्हाण
अशोक चव्हाण यांनी पुण्यातील भवानी पेठ येथील विशाल जनसंघर्ष यात्रेत बोलताना भाजपवर निशाणा साधला. पुण्याच्या वाहतुक कोंडीचा आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न भाजप खासदार, आठ आमदार, शंभर नगरसेवक, देशात, राज्यात आणि महापालिकेत सत्ता असतानाही सोडवू शकली नाही. सत्ताधारी खासदाराला पाण्याच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसण्याची वेळ येते हे दुर्देवी असल्याचे चव्हाण म्हणाले.
सरकार जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले असून, देशभरात मोठा गाजावाजा करीत स्मार्ट सिटी योजना सुरु केली. पुण्यात त्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्या योजनेतून पुण्याला काहीच मिळाले नसल्याचे चव्हाण म्हणाले.
