मी केलेल्या कृत्याचा मला पश्चताप नाही – पुजा पांडे

pooja-pandey1
अलिगड – हिदु महासभेच्या राष्ट्रीय महासचिव पुजा शकुन पांडे यांनी मी कोणताही गुन्हा केलेला नाही आणि त्याबद्दल मला कोणताही पश्चताप नाही. मला संविधानानेच गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळ्या मारण्याचा हक्क दिला असल्याचे वक्तव्य केले आहे. पोलिसांकडून तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री अलिगड मधील ताप्पल गावावरून पुजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे या दोघांना अटक करण्यात आली होती.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पुतळ्याला गोळी मारून पुजा शकुन पांडेने त्यांची पुण्यतिथी साजरी केली. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती. अखिल भारतीय हिंदू महासभा हा दिवस नेहमीच शौर्य दिवस म्हणून साजरा करते. पूजा शकुन पांडे हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. तिने त्यावेळी गांधीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळी मारताच पुतळ्यामधून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. हे कृत्य केल्यानंतर पांडे यांनी महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई वाटली होती. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी पुजा शकुन पांडेंची जवळचे संबंध आहेत. पोलिसांकडून याप्रकरणी अलीगड मधील १२ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिगडच्या नौरंगाबाद परिसरातील एका घरात ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Comment