9 वर्षीय मुलीने घेतले 14 किलो कोबीचे पीक !

cabbage

अमेरिकेतील पेंसिलवेनिया मधील एका नऊ वर्षांच्या मुलीने तब्बल 14 किलो वजनाच्या कोबीचे उत्पादन केले आहे. लिली रीस असे या मुलीचे नाव असून लिलीला सर्वात मोठी कोबी उत्पादन केल्यामुळे पुरस्कार देखील मिळाला आहे. हा सर्वात मोठा कोबी असल्याचे मानले जात आहे.

पीबल्स एलिमेंट्री शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या लिलीला 70 हजार रुपयांचे बक्षीस ही मिळाले आहे. राष्ट्रीय बोवनी प्लांट्स या कार्यक्रमात कोबीचे उत्पादन करणाऱ्या स्पर्धेत लिलीला हे बक्षीस मिळाले आहे. या स्पर्धेत जवळपास 32 हजार विद्यार्थींनी सहभाग घेतला होता.

लिलीने सांगितले की, ’14 किलोच्या कोबीचे उत्पादन घेण्यासाठी विशेष असे काहीही केले नाही. रोज नियमीतपणे रोपाला सूर्य किरण दिले आणि भरपूर प्रमाणात पाणी ही दिले, त्यामुळे कोबीच्या रोपाची वाढ चांगल्या प्रकारे झाली.’

Leave a Comment