एनएससी प्रमुखांसह दोघांचा मोदींवर नाराजी व्यक्त करत राजीनामा

NSC
नवी दिल्ली – राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या (एनएससी) प्रभारी प्रमुखांनी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या (एनएसएसओ) वर्ष २०१७-१८ च्या रोजगार आणि बेरोजगारीचे वार्षिक सर्वेक्षण रोखल्याचा विरोध करत राजीनामा दिला आहे. त्यांच्या एका सहकाऱ्यानेही पद सोडले आहे. जून २०१७ मध्ये एनएससीच्या सदस्यपदी सांख्यिकीतज्ज्ञ पी सी मोहनन आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक जे व्ही मीनाक्षी यांना नियुक्त केले होते. तीन वर्षांचा कार्यकाळ दोघांनाही देण्यात आला होता.

या दोघांनी राजीनामा एनएसएसओच्या अहवालाला उशीर होत असल्यामुळे दिला आहे. अशा पद्धतीने प्रसिद्ध होणारा या सरकारचा हा पहिला अहवाल होता. नोकरीच्या संधी नोटाबंदीनंतर कमी झाल्याची आकडेवारी या अहवालात समोर येणार असल्याचे बोलले जात आहे. २००६ मध्ये एनएससीची स्थापना झाली असून ही एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे देशाच्या सांख्यिकीय प्रणालीचे समीक्षण करणे हे काम आहे. जीडीपीवर आधारित माहितीला अंतिम स्वरूप देतेवेळी नीती आयोगाने तीन वर्षांपूर्वी एनएससीकडे दुर्लक्ष केले होते.

Leave a Comment