आता ‘जीओरेल’ अॅपवरून करा रेल्वे तिकीटाचे आरक्षण

jio-rail
मुंबई – जिओफोनच्या ग्राहकांकरिता दूरसंचार कंपन्यामध्ये आघाडीवर असलेल्या रिलायन्स जिओने नवीन सुविधा उपलब्ध करुन दिली असून ‘जीओरेल अॅप’द्वारा ग्राहकांना रेल्वेचे तिकीट आरक्षित करता येणार आहे.

रिलायन्सच्या माहितीनुसार ग्राहकांना अॅपमधून तिकीटे बुक करता येणार आहेत. तसेच तिकीटे रद्द करण्यात येणार आहेत. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ई-वॉलेटचा त्यासाठी वापर करावा लागणार आहे. पीएनआर स्थिती, रेल्वेची माहिती, वेळापत्रक, विविध मार्गावरील रेल्वे, उपलब्ध आसन क्षमतेसह इतर माहिती अॅपमधून मिळवता येणार आहे. ग्राहकांना जीओ अॅप स्टोअरमधील जिओरेल अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. ‘तात्काळ’ रेल्वे तिकीट आरक्षित करण्याची सुविधाही या अॅपमध्ये असल्याचे रिलायन्स कंपनीने म्हटले आहे. आयआरटीसीचे ऑनलाईन अकाउंट नसले तरी जीओरेल अॅपमधून नवे अकाउंट काढता येणार आहे. त्यातून विविध फूड ऑर्डर, रेल्वेचे प्रवासातील ठिकाण माहिती करून घेणे अशा विविध सेवांचा लाभ घेता येणार आहे.

Leave a Comment