टीम इंडियाचा किवींवर सामन्यासह मालिका विजय

ind
माउंट मॉन्गनुई – टीम इंडियाचा न्यूझीलंडविरोधातील तिसऱ्या वन-डे सामन्यात 7 गडी राखून दणदणीत विजयी मिळवीला आहे. न्यूझीलंडने भारताला 244 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान 3 गड्यांच्या मोबदल्यात 44 व्या षटकात पूर्ण केले.

ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे.
विराट कोहली आणि रोहित यांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. रोहितने 62 तर कोहलीने 60 धावा केल्या. यानंतर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक या जोडीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

न्यूझीलंडच्या भूमीवर विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला तब्बल एका दशकाची वाट पहावी लागली आहे. 2008-09 साली भारताने न्यूझीलंडमध्ये 3-1 च्या फरकाने वन-डे मालिका जिंकली होती.