विद्यार्थ्यांनी तयार केला जगातील सर्वात हलका उपग्रह, उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

satellite
हैदराबाद – जगातील वजनाने सर्वात हलका कलामसॅट उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे सोडण्यात आले. विशेष म्हणजे हा उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केला होता. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून गुरवारी मध्यरात्री ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे (पीएसएसव्ही-सी४४) यशस्वी प्रक्षेपण झाले. कलाम सॅट या उपग्रहाचे नाव माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

हा उपग्रह तामिळनाडूच्या एका उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. हा जगातील सर्वात हलका उपग्रह आहे. अवघ्या १.२ किलो वजनाचा हा उपग्रह आहे. या उपग्रहाला फेमटो उपग्रह म्हणूनही ओळखले जाते.

श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रातील शारच्या पहिल्या प्रक्षेपण तळावरून पीएसएलव्ही-सी४४ प्रक्षेपित करण्यात आला. रात्री ११ वाजून ३६ मिनिटांनी पीएसएलव्ही-सी४४ प्रक्षेपित करण्यात आला. मायक्रोसॅट-आर हा इमेजिंग उपग्रह असून पृथ्वीच्या कक्षेतून फोटो घेण्यास हा सक्षम उपग्रह आहे. या उपग्रहामुळे संरक्षण संशोधन व विकास संस्थेला (डीआरडीओ) संशोधनात्मक काम करण्यात मदत होणार आहे.

Leave a Comment