मोदींनी बापजन्मात कधीच चहा विकला नाही – प्रवीण तोगडिया

pravin-togdia
नवी दिल्ली – जाहीर सभांमधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपण आपला चरितार्थ चालवण्यासाठी चहा विक्रीचा सुद्धा व्यवसाय केला होता असे आवर्जुन सांगतात. पण नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकलाच नाही असा दावा विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केला आहे.

माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर ४३ वर्ष मैत्री होती. पण त्यांना मी कधी चहा विकताना पाहिले नाही. पंतप्रधान मोदी फक्त लोकांची सहानुभूति मिळवण्यासाठी चहा विक्रेत्याच्या प्रतिमेचा वापर करत असल्याचा आरोप तोगडिया यांनी केला. त्यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन आरएसएस आणि भाजपवरही टीका केली.

राम मंदिर आरएसएस आणि भाजपला बांधायचे नाही असा आरोप त्यांनी केला. आता आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया अध्यक्ष आहेत. आरएसएसचे नेते भय्याजी जोशी यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर पुढच्या पाचवर्षात राम मंदिर बांधले जाणार नाही असे म्हटल्याचे तोगडिया म्हणाले. १२५ कोटी भारतीयांना भाजप आणि आरएसएसने अंधारात ठेवले होते पण या देशातील हिंदू आता जागे झाले आहेत. हिंदुंच्या नव्या पक्षाची घोषणा नऊ फेब्रुवारीला होईल. संसदेत एकदा पक्षाला विजय मिळाला की, दुसऱ्याचदिवशी मंदिराचे बांधकाम सुरु होईल असे तोगाडिया म्हणाले.

Leave a Comment