सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी संजय जैन; तर न्यायाधीशपदी माहेश्वरी, खन्ना यांची नियुक्ती

supreme-court
नवी दिल्ली – ज्येष्ठ वकील संजय जैन यांची सर्वोच्च न्यायालयात ‘अतिरिक्त सॉलिसिटर जनरल’ तर न्यायाधीश दिनेश माहेश्वरी आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली आहे.

३० जून २०२०पर्यंत जैन हे या पदावर राहणार आहेत. अधिकृत पत्रकाद्वारे याची घोषणा करण्यात आली आहे. ‘लॉ ऑफिसर अॅक्ट १९८७’ अंतर्गत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांची निवड करण्यात येत असते. सॉलिसिटर जनरल यांना सहाय्य करणे ही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांची भूमिका असते.

दिनेश माहेश्वरी हे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी आहेत, तर संजीव खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. माहेश्वरी आणि खन्ना यांची या पदावर नियुक्ती करण्यासाठी कॉलेजियमनुसार शिफारस करण्यात आली होती.

Leave a Comment