पहिल्या एकदिवसीय सामन्यातून हार्दिक-राहुलचा पत्ता कट

trio
सिडनी – कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची फळे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि सलामी फलंदाज के. एल. राहुल यांना भोगावी लागली आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुध्द उद्या खेळल्या जाणा-या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून पत्ता कापला आहे. या संदर्भातला निर्णय बीसीसीआयचे अध्यक्ष विनोद राय यांनी घेतला आहे.

दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने या संदर्भात त्या वादग्रस्त वक्तव्याच्या बाजूने आम्ही संघ म्हणून उभे नाही. चौकशी सुरू असून आम्ही निर्णयाची वाट पाहत असल्याचे म्हटले होते.

दुसरीकडे ‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध चॅट शोचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलचा नुकताच प्रसारित झालेला एपिसोड ‘हॉटस्टार’वरून डिलीट करण्यात आला आहे. शोमध्ये हार्दिक आणि लोकेश राहुल या दोघांनी महिलांविषयी काही आक्षेपार्ह वक्तव्य केली. दोघांवर त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड टीका झाली. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता ऑनलाइन स्ट्रिमिंग पार्टनर ‘हॉटस्टार’वरून ‘कॉफी विथ करण शो’चा तो एपिसोड काढून टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर या शोचे सर्व टीझर आणि फोटो ‘स्टार वर्ल्ड’ या वाहिनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून काढून टाकले आहेत.

Leave a Comment