लष्करप्रमुख म्हणतात, भारतीय लष्करात नको ‘समलैंगिक’

bipin-rawat
नवी दिल्ली : वार्षिक पत्रकार परिषदेत पाकिस्तान, चीन सीमा, दहशतवाद, काश्मीर अशा अनेक मुद्द्यांबाबत लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी चर्चा केली. या परिषदेतला एक मुद्दा भारतीय दंडविधान कलम 377 चाही होता.

सरकारने कलम 377 मध्ये बदल केल्याने समलैंगिक संबंध ठेवणे आता कायद्याने गुन्हा ठरणार नाही. पण या कायदाबदलाने लष्कराला काही फरक पडणार नसल्याचे जनरल रावत म्हणाले. भारतीय लष्कर कॉन्झर्वेटिव्ह आहे आणि येथे व्यभिचार करण्याची कुणालाच अनुमती नसल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर भारतीय सैन्याने चांगला बंदोबस्त ठेवलेला आहे आणि कुठलेही चिंतेचे कारण नसल्याचा दिलासा त्यांनी दिला. जम्मू काश्मीरमध्ये शांती नांदावी यासाठी आम्ही केवळ समन्वयकाची भूमिका बजावत आहोत. काश्मीरमधल्या परिस्थितीची तुलना तालिबानशी करता येऊ शकत नाही, असे सांगताना जनरल रावत म्हणाले, राज्यात दहशतवाद्यांच्या नाही, आमच्या अटींबाबतही चर्चा व्हायला हवी. जनरल रावत पाकिस्तानला कडक भाषेत इशारा देताना म्हणाले, एकाच वेळी दहशतवाद आणि चर्चा होऊ शकत नाही. म्हणून बंदुका सोडा आणि हिंसा बंद करा.

Leave a Comment