२०१९ हे वर्ष बॉलिवूडचा ‘दबंग’ स्टार सलमान खानसाठी विशेष महत्वाचे ठरणार आहे. त्याचा बहूप्रतिक्षित ‘भारत’ हा चित्रपट या वर्षात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अली अब्बास जफर करत आहेत. सलमान लवकरच ‘दबंग-३’ चित्रपटाच्याही शूटिंगला सुरुवात होणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला एप्रिल महिन्यात होणार असल्याचा खुलासा अरबाज खानने केला आहे.
Yesterday Rajjo and Chulbul Pandey Coincidentally met with Mahesh Sajid and Wajid…#dabangg8yrs. See u in #Dabangg3 next year pic.twitter.com/cppCaH07Y1
— Salman Khan (@BeingSalmanKhan) September 11, 2018
यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभूदेवा ‘दबंग-३’चे दिग्दर्शन करणार आहे. प्रभूदेवासोबत सलमान खानने यापूर्वी ‘वान्टेड’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. ‘दबंग’ चित्रपटाला सप्टेंबर २०१८मध्ये आठ वर्षे पूर्ण झाले. सोनाक्षी सिन्हाने या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. सोनाक्षीने दबंग-२मध्येही भूमिका साकारली होती. आता तिसऱ्या भागातही ती झळकणार असल्याचे बोलले जात आहे.
अभिनव कश्यपने दबंगच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन केले होते, तर दबंग-२चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. आता प्रभूदेवाकडे दबंग-३च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, दबंग-३ ची सुरुवात करण्यापूर्वी सलमान खान ‘भारत’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात आली आहे. जेव्हा याबद्दल सांगण्याची वेळ येईल, तेव्हाच याचा खुलासा करणार असल्याचे अरबाज खानने म्हटले आहे.