अनोख्या पद्धतीने ‘ठाकरे’ चित्रपटाचे प्रमोशन

thakre
येत्या 25 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट ‘ठाकरे’ प्रदर्शित होत आहे. मुंबईत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पतंगांचा मोठा वापर करण्यात येत आहे.

पतंग मकर संक्रांतीच्या सणाला मोठ्या प्रमाणात उडवले जातात. मुंबईत पतंगांचे बाजार सजू लागले आहेत. सर्वांचे लक्ष वेधता यावे यासाठी ठाकरे चित्रपटासाठी खास पतंग बनवण्यात आले आहेत. भगव्या रंगात तयार केलेल्या पंतगावर ‘ठाकरे’ जगभरात प्रदर्शित २५ जानेवारी २०१९, असे लिहिले आहे. अशा प्रकारे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पंतग तयार करण्यात आले आहेत. हे पंतग मोफत वाटण्यात येत आहेत.

लोक मकर संक्रातीला मोठ्या प्रमाणात पतंग उडवतात. यामुळे निर्मात्यांनी ही शक्कल लढवली आहे. ग्राहकांची ‘ठाकरे’ पतंगीला चांगली पसंती मिळत आहे. लोक ही पतंग घेण्यासाठी गर्दी करत आहेत. या प्रकारचे २५ हजार पतंग बनवण्यात आल्याचे एका मुस्लीम विक्रेत्याने सांगितले. ठाकरे चित्रपट सुपर-सुपर हीट होणार आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांनी हमारे ठाकरेसाब का देखना चाहिऐ, असे पंतग विक्रेत्या मुस्लीम व्यक्तीने सांगितले.

Leave a Comment