१४ वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेची प्रसुती

america
न्यूयॉर्क : अमेरिकेत फिनिक्स एरिजोना येथे गत १४ वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने एका मुलाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांसह सर्वच या घटनेने आश्चर्यचकित झाले आहेत. तथापि, पोलिसांनी लैंगिक शोषणाची चौकशी सुरू केली आहे.

२९ डिसेंबर २०१८ रोजी एका मुलाला या महिलेने जन्म दिला. विशेष म्हणजे ही महिला गर्भवती असल्याची माहिती कुणालाच कशी झाली नाही? याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत असे सांगण्यात येत आहे की, १४ वर्षांपूर्वी या महिलेच्या आई-वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. ही महिला त्यानंतर कोमात गेली. हॅसिंडाचे प्रवक्ते डेव्हिड लिबोविट्ज यांनी सांगितले की, ही घटना बुचकळ्यात टाकणारी आहे. तथापि, कर्मचाऱ्यांची याप्रकरणी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे काय? या प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्यास टाळले. तथापि, याप्रकरणी पुरुष कर्मचा-यांची डीएनए चाचणी करणेच उचित ठरेल, असेही मत व्यक्त होत आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या खोलीत जेव्हा एक नर्स दाखल झाली तेव्हा या महिलेला वेदना असह्य झाल्या होत्या. डॉक्टरांना त्यानंतर पाचारण करण्यात आले. नवजात बाळाची प्रकृती चांगली आहे. सर्वप्रथम हे वृत्त न्यूज वेबसाईट ‘एज फॅमिली डॉट कॉमने’ दिले. त्यांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे की, हे या हॉस्पिटलच्या स्टाफला माहीत नव्हते की, ती गर्भवती आहे.

Leave a Comment