स्मार्टफोन मध्ये का असतो हा छोटा लाईट?

lightfon
स्मार्टफोन हा आजच्या काळात माणसाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे. काही जणांसाठी तो जवळचा दोस्त आहे तर काहीजनाच्या हृदयाची धडकन. थोडावेळ जरी फोन हातात नसेल, किंवा सापडत नसेल तर जीव कासावीस होतो याचा अनुभव अनेकजण घेतात. अश्या या आवश्यक स्मार्टफोन मध्ये काही कंपन्याच्या मॉडेलमध्ये वरच्या कोपऱ्यात एक छोटासा लाईट दिला जातो. हा लाईट का असतो याची माहिती अनेकांना नसते. तर हा लाईट म्हणजे तुमच्या स्मार्टफोनचे हृदय आहे हे लक्षात घ्या.

हा लाईट सतत ब्लिंक करतो, याचा अर्थ तुमचा फोन जिवंत आहे म्हणजे त्याची बॅटरी आहे आणि तो चालू आहे. अंधारात या लाईटमुळे फोन शोधणे सहज शक्य होते. हा लाईट काही मॉडेलमध्ये वेगवेगळ्या रंगात दिसतो. हिरवा, लाल आणि पांढरा असे हे रंग असतात. हिरवा लाईट याचा अर्थ फोन चार्ज आहे. लाल लाईट याचा अर्थ फोनला चार्जिंगची गरज आहे तर पांढरा लाईट हि नोटिफिकेशनची खूण आहे. फोनचे चार्जिंग सुरु असताना बरेच वेळा पांढरा लाईट दिसतो.

Leave a Comment