या नरकाच्या दारातून गेली ४७ वर्षे उठताहेत आगीचे लोळ

mithen1
तुर्कमेनिस्तानच्या काराकुम वाळवंटात गेल्या ४७ वर्षापासून एका खड्ड्यातून आगीचे लोळ बाहेर पडत आहेत. या खड्ड्याला स्थानिक लोक नरकाचे दार म्हणतात. विशेष म्हणजे हे एक पर्यटनस्थळ बनले असून येथे दरवषी हजारो पर्यटक येतात.

या नरकाच्या दाराची कथा अशी की ७० च्या दशकात जेव्हा सोविएत युनियन हा जगातील सर्वात बलाढ्य देश होता, तेव्हा ७१ साली संशोधकांची एक टीम नैसर्गिक वायूच्या शोधात या वाळवंटात आली. त्यांनी तेथे एक खड्डा खोडला आणि मोठी मशीन सुरु करून जमिनीत ड्रिलिंग सुरु केले. एक दिवस अचानक हा खड्डा धसला आणि सुमारे १३० फुट रुंद व ६० फुट खोलाचा खड्डा तयार झाला.

mithen
या खड्ड्यातून मिथेन वायू बाहेर पडू लागला तेव्हा मिथेन जळून जावा म्हणून या संशोधकांनी त्याला आग लावली, मात्र गेली ४७ वर्षे ती विझवता आलेली नाही. हा खड्डा भरण्याचा पर्यंत अनेकदा केला गेला मात्र त्यालाही यश आले नाही. आता या खड्डयाजवळ जायची लोकांना भीती वाटते आणि ते त्याला नरकाचे दार म्हणतात. येथे मिथेनचा घाणेरडा वास आजही येतोच.

Leave a Comment