इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांची ‘उपासमार’ करणार जेट एअरवेज

jet-airways
मुंबई: आता इकॉनॉमी क्लासने देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत जेवण न देण्याचा निर्णय आर्थिक संकटातून जात असलेल्या जेट एअरवेजने घेतला आहे. कंपनीने हा निर्णय कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी घेतला आहे. पण जेवण इकॉनॉमी क्लासमधील प्रवासी विकत घेऊ शकणार आहे. सध्या आर्थिक संकटातून जेट एअरवेज विमान कंपनी जात असून एक हजार २६१ कोटी रुपयांचा कंपनीला तोटा झाला असल्याची माहिती जेट एअरवेज दिली आहे.

पाच विविध श्रेणी जेट एअरवेजच्या इकॉनॉमी क्लासमध्ये आहेत. कंपनीने त्यामधील दोन श्रेणींमध्ये मोफत जेवणाची सोय या आधीच बंद केली आहे. येत्या ७ जानेवारीपासून आता आणखी दोन श्रेणींसाठी मोफत जेवण बंद करण्यात येणार आहे. बिझनेस क्लाससाठी आणि इकॉनॉमी क्लासमधून परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र मोफत जेवण मिळणार आहे.

Leave a Comment