देवाच्या शोभायात्रेसाठी बंद केला जातो हा विमानतळ

kochi
केरळच्या कोचीनचा आंतरराष्रीजाय विमानतळ हा जगातील एकमेव असा विमानतळ आहे जो भगवान पद्मनाभाच्या शोभायात्रेसाठी वर्षातून दोन वेळा पाच तासापेक्षा अधिक काळ बंद ठेवला जातो. या वेळी विमान उड्डाणे होत नाहीत कारण हि शोभायात्रा विमानतळाच्या रनवे वरून जाते. लॉर्ड पद्मनाभ यांची शोभायात्रा वर्षातून दोन वेळा निघते आणि गेली काही दशके त्यावेळी या विमानतळावरील उड्डाणांच्या वेळा बदलल्या जातात.

padmnabh
केरळ राज्यातील पद्मनाभस्वामी मंदिर जगात प्रसिद्ध असून अतिश्रीमंत देवस्थानापैकी एक आहे. देशातील हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. या मंदिरात विष्णूची शेषशाई विशालकाय मूर्ती शयन मुद्रेत असून लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा वार्षिक महोत्सव दहा दिवस चालतो आणि त्यात शेवटच्या म्हणजे १० व्या दिवशी देवाची शोभायात्रा काढली जाते. हि यात्रा कोची विमानतळावरील रनवे क्रॉस करून जाते त्यामुळे यावेळी हा विमानतळ बंद ठेवला जातो असे समजते.