हसन अली – वय वर्षे 11, करणार इंजिनीयरिंगची कोचिंग

engineer
प्रतिभेला वयाचे बंधन नसते. ही म्हण हैद्राबादच्या मलकपेट भागात राहणाऱ्या हसन अली या मुलाने सार्थ ठरविली आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या हसनला इंजिनीयरिंग महाविद्यालयात शिकविण्याचे आमंत्रण मिळाले असून त्यावर तो गांभीर्याने विचार करत आहे.

केवळ 11 वर्षाच्या हसन अली याने 12वीच्या पुढच्या पुस्तकांचाही खोलवर अभ्यास केला आहे. त्यामुळेच त्याने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा दावा केला आहे. हसनकडे अद्भूत प्रतिभा असल्याचे मानले जात आहे. एवढ्या कमी वयात त्याने ऑटोकॅड, 2-डी, 3-डी, रेविट आर्किटेक्चर, एमईपी, स्टाड प्रो इत्यादी विषयांत प्रभूत्व मिळविले आहे.

या सॉफ्टवेयर अॅप्लिकेशन्सच्या व्यतिरिक्त हसनकडे पुस्तकातील ज्ञानही भरपूर आहे. हैद्राबादच्या वर्धमान कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयाने नुकतीच कॉम्प्युटर अॅडेड ड्रॉईंगची परीक्षा आयोजित केली होती. त्यावेळी अली याला या स्पर्धेत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते आहे, असे सियासत वृत्तपत्राने म्हटले आहे.

Leave a Comment