घोरण्यावर नियंत्रण आणेल नासाची खास उशी

pillow
दिवसभर कष्ट करून दमल्यानंतर रात्री गाढ, शांत झोप लागावी अशी अनेकांना इच्छा असते मात्र घोरणारे लोक शेजारी असतील तर सुखाची झोप नशिबी येत नाही याचा अनुभव अनेकजण घेतात. यावर एक खास उशी अमेरिकी अंतराळ संस्था नासाने तयार केली आहे. यामुळे घोरण्यावर नियंत्रण येते. अर्थात या उशीसाठी भरभक्कम रक्कम मोजावी लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हि उशी अंतराळात अंतराळवीरांना वेगळ्या तापमानाचा जो त्रास सहन करावा लागतो तो कमी करण्यासाठी बनविली गेली होती. नासाने या साठी दोन प्रकारच्या उश्या बनविल्या आहेत. त्यातील एक घाम शोषून घेते तिची किंमत ७१०० रु. असून तिचे नामकरण हिब्र असे करण्यात आले आहे. दुसरी उशी झिक नावाने तयार केली गेली असून तिची किंमत २०० डॉलर्स म्हणजे १४ हजार रु. आहे. यात स्लीप सेन्सर, स्पीकर व्हायब्रेटर बसविले गेले आहेत.

यामुळे माणूस घोरायला लागला कि उशी व्हायब्रेट होते आणि घोरणाऱ्या माणसाला अलगद जाग येते त्यामुळे घोरणे कमी होते असा दावा केला जात आहे.

Leave a Comment