इम्रान सरकार करणार पंतप्रधान निवासातील म्हशींचा लिलाव

imran
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना नवाज शरीफ यांनी अधिकृत सरकारी बंगल्यात गरज पडली तर असाव्यात म्हणून पाळलेल्या ८ म्हशींचा लिलाव करण्याचा निर्णय इम्रान सरकारने घेतला आहे. इम्रानखान याचे निकटवर्ती आणि तेहरिक ए इन्सानचे वरिष्ठ नेते यांनी या संदर्भात ट्विटर वरून माहिती दिली असून म्हशींच्या खरेदीसाठी ग्राहकांनी तयार राहावे असे आवाहन केले आहे.

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने सरकारी खर्चात काटकसर करण्याचे अनेक मार्ग शोधले जात आहेत. त्यात पंतप्रधान निवासातील ८० अलिशान कार्स विक्री. अतिरिक्त चार हेलिकॉप्टरव्ही विक्री असे निर्णय यापूर्वीच घेतले असून म्हशी विकण्याचा निर्णय त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानच्या चालू खात्यातील तुट १८ अब्ज डॉलर्सवर गेली असून गंगाजळी १० अब्ज डॉलर्स आहे. हा पैसा दोन महिन्याच्या आयातीसाठी जेमतेम पुरणारा आहे. त्यामुळे अलिशान कार्स, चीज, पनीर, स्मार्टफोन यांच्या आयातीवर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे.

Leave a Comment