मनोरंजनाचे शहर लास व्हेगास

las-vegas
लास व्हेगस हे शहर १९५० साली वसविले गेले. मोजता येणार नाहीत इतक्या संख्येने येथे असलेल्या कॅसिनोची झगमगती दुनिया आणि अतिशय रंगेबिरंगी, आकर्षक असे नाईट लाईफ असलेले लास व्हेगस शहर जगाचे ‘एन्टरटेनमेंट कॅपिटल’ समजले जाते. या शहराचा झगमगाट आणि आणि ग्लॅमर डोळे दिपवणारे आहे. या शहराविषयी आणखी काही रोचक तथ्ये खास माझा पेपरच्या वाचकांसाठी.
las-vegas1
लास व्हेगस हे शहर तेथील नाईट लाईफ करिता प्रसिद्ध आहे. म्हणजेच या शहरामध्ये कॅसिनो आणि इतर मनोरंजनाची ठिकाणे रात्रभर सुरु रहात असल्याने सर्वत्र दिव्यांचा झगमगाट असतो. म्हणूनच हे शहर जगातील सर्वात ‘उजळलेले’ शहर म्हणून ओळखले जाते. हा झगमगाट इतका प्रखर असतो. की हे शहर अंतराळातून देखील झगमगताना पहिले जाऊ शकते. लास व्हेगस नंतर शांघाई हे शहर जगातील सर्वात झगमगते शहर म्हणून ओळखले जाते. विशेष गोष्ट अशी, की लास व्हेगस शहरातील सर्व सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणे येथे पुरविली जाणारी वीज ‘रिन्यूएबल एनर्जी’ आहे.
las-vegas2
जगातील २५ सर्वात मोठ्या हॉटेल्स पैकी तेरा हॉटेल्स लास व्हेगस शहरामध्ये आहेत. ही हॉटेल्स शहराच्या ज्या भागामध्ये आहेत, त्या भागाला ‘द स्ट्रीप’ म्हटले जाते. ६.८ किलोमीटर्स विस्तार असलेल्या या भागामध्ये ही सर्व हॉटेल्स आणि कॅसिनो आहेत. यातील ‘द व्हेनेशियन’ व ‘द पलाझो’ हे हॉटेल सर्वात मोठी असून, या हॉटेलच्या ५३ माजली इमारतीमध्ये ७१३३ रूम्स आहेत. एमजीएम ग्रँड प्लस सिग्नेचर आणि सिटी सेंटर ही हॉटेल्सही खूपच मोठी आहेत.
las-vegas3
लास व्हेगस शहरामध्ये खुलेआम मद्यपान करण्यावर बंदी नाही. किंबहुना येथे खुलेआम, सावजानिक ठिकाणी मद्यपान करण्यास कायद्यानेच परवानगी दिलेली आहे. अति मद्यप्राशन केल्याने ‘हँग ओव्हर’ आलेल्या व्यक्तींना डीहायड्रेशन किंवा तत्सम समस्या उद्भवू नयेत या करिता लास व्हेगस मध्ये ‘हँगओव्हर हेवन’ नामक बस सर्वप्रकारचे वैद्यकीय उपचार करण्यासाठी सदैव सज्ज असते. लास व्हेगस येथे असणाऱ्या खेळाच्या मैदानांमध्ये हौशी लोकांना बुलडोझर्स आणि एक्सकव्हेटर्स चालविण्याची मुभा आहे. चौदा वर्षे वयाच्या वरील कोणाही व्यक्तीला हे बुलडोझर्स तीन तासांकरिता चालविण्याचा आनंद घेता येऊ शकतो.

Leave a Comment