एक्स्प्रेस गाड्यांमध्येही आता डिस्प्ले बोर्ड आणि उद्‌घोषण यंत्रे


सध्या राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्येच उपलब्ध असलेली डिस्प्ले बोर्ड आणि उद्‌घोषण यंत्रांची सुविधा अन्य एक्स्प्रेस गाड्यांमध्येही आता बसविण्यात येणार आहेत. रेल्वेच्या नवीन डब्यांमध्ये दृष्टीबाधित प्रवाशांसाठी एकात्मिक बेल संकेत व्यवस्थाही करण्यात आली आहे.

रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी सोमवारी राज्यसभेत ही माहिती दिली. ईमू तसेच हमसफर, तेजस या सारख्या प्रतिष्ठीत गाड्यांमध्ये डिस्प्ले बोर्ड आणि सार्वजनिक उद्‌घोषणा प्रणाली बसवण्यात आली आहे. त्याशिवाय अनुभूती डब्यांमध्ये एलसीडी स्क्रीनवर जीपीएस आधारित प्रवासी सूचना प्रणाली बसवण्यात आली आहे. एलसीडी स्क्रीनवर पुढील स्थानक, शेवटचे स्थानक, गाडीची स्थिती आणि सुरक्षेसंबंधी माहिती उपलब्ध करून दिली जाते. मात्र एक्स्प्रेस गाड्यांमध्येही आता डिस्प्ले बोर्ड आणि उद्‌घोषण यंत्रे बसविण्यात येणार आहेत. तसेच वाद्यसंगीत वाजवण्यासाठी आणि ताज्या बातम्या देण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. , अशी माहितीही त्यांनी दिली.

अलिकडे झालेल्या दुर्घटना लक्षात घेऊन रेल्वेने काही उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार 1 एप्रिल 2018 पासून आयसीएफ डब्यांची निर्मिती पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी एलएचबी रचनेचे डबे लावले जातील. प्रत्येक मिनिटाला गाडीच्या मोटरमनची सतर्कता तपासण्यासाठी सर्व इलेक्ट्रीक लोकोमोटीव्हमध्ये व्हिजिलन्स कंट्रोल डिवाईस बसवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment