फूडडिलिव्हरी एक्झिक्युटिव्हना आले अच्छे दिन


आजकाल शहारून घरपोच खाद्यपदार्थ मागविण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असल्याने अशी सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. परिणामी ग्राहकांना ऑर्डरची डिलिव्हरी करणाऱ्या लोकांना चांगले दिवस आले असून त्याच्या पगारात भरघोस वाढ झाली आहे. स्विगी, झोमॅटो, उबरइट सारख्या या लोकांना आता ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत पगार देत असून पूर्वी हे प्रमाण १८ ते २० हजार रुपये होते. बाईकवरून डिलिव्हरी देणाऱ्याना डिलिव्हरी एक्झीक्युटीव्ह असे म्हणले जाते.

पगाराव्यतिरिक्त या लोकांना पिक अवर किंवा पावसात डिलिव्हरी देण्यासाठी वेगळे पैसे दिले जातात. हे प्रमाण प्रत्येक डिलिव्हरीमागे ४० ते ५० रु. असे आहे. फूड डिलिव्हरी सेवा कंपन्या तेजीत असल्याने अन्य माल घरपोच देणाऱ्या फ्लिपकार्ट, बिग बास्केट, फेडेक्स सारख्या कंपन्यांनाहि माल पोहोचविणाऱ्याना अधिक पगार मोजावा लागतो आहेच पण फूड डिलिव्हरी देण्यात अधिक पैसे मिळत असल्याने नोकर टिकवून ठेवणे या कंपन्यांना अवघड बनले आहे असे समजते. कारण बायकर्स दुसऱ्या अधिक पैसे मिळणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य देताना दिसत आहेत.

स्विगी कडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी मध्ये त्याच्याकडे ३० हजार डिलिव्हरी एग्झिक्यूटीव्ह होते ती संख्या आता ५५ हजारापेक्षा अधिक आहे तर झोमॅटोकडे हि संख्या ५० हजार असून येत्या काही दिवसात ती १ लाखावर नेली जाणार आहे. बंगलोर, हैद्राबाद, पुणे, दिल्ली सारख्या शहरात या सेवा अधिक तेजीत असुन येथे इंसेन्टीवचे प्रमाण प्रत्येक डिलिव्हरी मागे ८० ते १२० रु. आहे.

Leave a Comment