भारतामधील या शहरामध्ये प्रथमच स्वच्छतेच्या कामी रोबोट्सचा होत आहे वापर


अगदी अलीकडच्या काळामध्ये दक्षिण भारतातील कुंभकोणम शहरामध्ये रस्त्यांवरील कचरा सफाईच्या कामी रोबोट्सचा वापर करण्यात येत आहे. तमिळनाडू मधील कुंभकोणम शहराच्या प्रशासनाने सुरु केलेल्या या आधुनिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतरही अनेक शहरांच्या स्थानिक प्रशासनांनी या उपक्रमाचे अनुकरण करण्याचे ठरविले आहे. या आधुनिक उपक्रमांमुळे ड्रेनेजआणि कचरा सफाईचे काम करणाऱ्या सफाई कामगारांचे काम पुष्कळ हलके होणार आहे.

हे रोबोट्स कचऱ्याचे वर्गीकरण करून, ओला आणि कोरडा कचरा वेगळा करू शकण्यास सक्षम आहेत. तसेच या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्या त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे कामही हे रोबोट्स करीत आहेत. अश्या प्रकारचा उपक्रम प्रायोगिक पातळीवर सर्वप्रथम तिरुवनंतपुरम येथे सुरु करण्यात आला होता. या उपक्रमासाठी त्या काळी दहा लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यांनतर हा उपक्रम कुंभकोणम येथे राबविण्यात आला. या उपक्रमासाठी इंडियन ऑइल कंपनी कडून आर्थिक सहाय्य घेण्यात आले आहे.

Leave a Comment