आजपासून शाओमीचा धमाकेदार सेल; ४ रुपयांत मिळेल ५५ इंच एलईडी टीव्ही आणि स्मार्टफोन


चिनी कंपनी शाओमी भारतीय बाजारात ४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपली ‘अॅनिवर्सरी’ साजरी करत असून कंपनीने यासाठी ४थ्या एमआय अॅनिवर्सरी सेलचे आयोजन केले आहे. हा सेल १० जुलै ते १२ जुलैदरम्यान असणार आहे. अनेक धमाकेदार ऑफर आणि मोठ्या प्रमाणात सूट या सेलमध्ये कंपनीकडून दिली जात आहे. दरम्यान अवघ्या ४ रुपयांत या सेलमध्ये काही प्रोडक्ट खरेदी करण्याची ऑफर कंपनीकडून देण्यात आली आहे.

अवघ्या 4 रुपयांमध्ये सेलमध्ये ग्राहक एमआय एलईडी स्मार्ट टीव्ही ४ (५५ इंच), रेडमी वाय१, रेडमी वाय २, रेडमी नोट ५ प्रो आणि एमआय बॅंड २ या वस्तू खरेदी करु शकतात असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर शाओमी एमआय मिक्स २ आणि शाओमी एमआय मॅक्स २ यांसारखे फोन कमी किंमतीत विक्रीसाठी असणार आहेत. पण किती डिव्हाइसची विक्री 4 रुपयांमध्ये केली जाईल याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा सेल १० ते १२ जुलैदरम्यान रोज दुपारी ४ वाजता सुरू होईल.

त्याचबरोबर काही कॉम्बो ऑफऱ देखील कंपनीने आणल्या आहेत. यामध्ये केवळ १ हजार ९९९ रुपयांमध्ये Mi Body Composition Scale + Mi Band 2 खरेदी करता येईल. तसेच Redmi Note 5 + Mi VR play 2 ९ हजार९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल आणि ८ हजार ९९९ रुपयांमध्ये Redmi Y1 + Mi Bluetooth Headset खरेदी करता येईल. या सर्व प्रोडक्ट्सच्या केवळ २०० युनिट्सची विक्री कॉम्बो ऑफरअंतर्गत केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Leave a Comment